कोल्हापूर-श्री जोतिबा देवाचा सरता रविवार पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करून शेवटच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. आता जोतिबा देवाचा पालखी सोहळा चार महिने बंद असणार आहे. खंडेनवमीला पालखी सोहळा निघणार आहे.
जोतिबा मंदिरात सरता रविवारनिमित्त देवास पंचामृत व आमरसाचा अभिषेक घालण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी जोतिबा मंदिराभोवती तीन-चार पदरी दर्शन रांगा लावल्या होत्या. सकाळी अकरा वाजता धुपारती सोहळा झाला. भाविकांनी गुलाल-खोबऱ्यांची उधळण करून धुपारतीचे दर्शन घेतले. दरम्यान, रात्री नऊ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. भाविकांबरोबर स्थानिक पुजारी समाजही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यास उपस्थित होता. नवीन कपडे परिधान करून स्थानिक पुजाऱ्यांनी साखर-पेढे वाटले.
#jyotibadongar #kolhapur #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19